Pune News: सर्व पाळीव मांजरांना खराडी येथील पर्यायी ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले आहेत. परवानाधारक पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार तत्काळ वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि नसबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील हडपसरमधील एका सोसायटीमध्ये दोन महिलांनी आपल्या घरात 300 पेक्षा अधिक मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याआधी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे 60 मांजरी पाळल्याबद्दल आणि त्यांची नोंदणी न केल्याबद्दल महापालिकेने त्यांना नोटीस दिली होती. त्यानंतरही महिलांनी नोटिशीला न जुमानता दोन वर्षांत आणखी मांजरांची संख्या वाढवली. त्यामुळे सोसायटी फॉर द प्रीव्हेन्शन ऑफ कुएल्टी ऑफ अॅनिमल्स (एसपीसीए) या संस्थेतर्फे महिलांना नोटीस पाठविण्यात आली आहे. सर्व पाळीव मांजरांना खराडी येथील पर्यायी ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले आहेत. परवानाधारक पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार तत्काळ वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि नसबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि महापालिकेने हस्तक्षेप केला आणि या फ्लॅटची पाहणी केली. रिंकू आणि रितू या दोघी बहिणींनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरलं आणि तब्बल 2 तास वाट बघायला लावली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पाहणी केल्यानंतर 48 तासात मांजरी हलवण्याबाबत दोघी बहिणींना संगितले मात्र, अजूनही मांजरी हालवण्यात आल्या नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका यावर कधी कारवाई करणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
हडपसर भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबत महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे सोसायटीतील रहिवाशांनी तक्रार केली होती. पुणे जिल्हा एसपीसीए, पशुसंवर्धन विभाग, पुणे महापालिका आणि पुणे पोलिस महिला कॉन्स्टेबलसह इतरांनी या महिलांच्या घरी भेट दिली. घराची तपासणी करण्यात आली. मांजरींचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आला. तसेच, फ्लॅटमध्ये मांजरींची विष्ठा व प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे एसपीसीएच्या सहकार्याने पाळीव प्राण्यांच्या मालकाला 48 तासांच्या आत तत्काळ निवासस्थानातून 300 हून अधिक मांजरांना पर्यायी ठिकाणी हलविण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.
रहिवाशांचा मनस्ताप वाढला
सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मांजरांमुळे सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मांजरांचे मोठ्या आवाजात ओरडणे, तसेच त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो आहे, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.
महापालिका आणि पोलिसांत तक्रार दाखल
रहिवाशांनी 2020 मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा 350 वर पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.