Sarkarnama News Source
पुण्याचे माजी आयुक्त IPS अमिताभ गुप्तांची ₹350 कोटींची संपत्ती ? ACB ची चौकशी सूरू..
Amitabh Gupta ACB investigation: पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन त्यांची चौकशी करण्यात आली होती. अमिताभ गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी एसीबीकडुन पुर्ण झाली आहे. गुप्त चौकशीनंतर त्यांच्या उघड चौकशीची परवानगी एसीबीच्या महासंचालकांकडे मागण्यात आली आहे. गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे.
गुप्ता यांच्या विरोधात माहीती आधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी तक्रार दाखल केली होती
अमिताभ गुप्ता हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते. अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्याची एसीबीकडून चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुप्ता यांची पुण्यातील ॲमनोरा टाउनशिपमधील स्वीट वॉटर विला प्रकल्पात आलिशान विला आहे, ज्याची किंमत 25 कोटी असल्याचा आल्हाट यांचा दावा आहे. तसेच, मुंबईतील सांताक्रुझ येथेही त्यांचा एक आलिशान फ्लॅट असून, त्याची किंमत 22 कोटी रुपये असल्याचे आल्हाट यांनी सांगितले आहे.