प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या रात्री एक दुर्दैवी घटना घडली. रात्री २ वाजता संगम नोज येथे चेंगराचेंगरी झाली, ज्यात ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्ण यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.
वैभव कृष्ण म्हणाले, "भाविक ब्रह्म मुहुर्ताची वाट बघत होते, कारण ब्रह्म मुहुर्तावर स्नान करणं पवित्र मानलं जातं. अचानक काही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले. पाठीमागून आलेल्या गर्दीमुळे हलकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. २९ तारखेला येथे कुणीही व्हिआयपी येणार नव्हते आणि आगामी दिवसांमध्येही व्हिआयपी मुव्हमेंट नसणार आहे. आज मौनी अमावस्या असल्याने मुख्य स्नान पर्वणी आहे. बेला परिसरातल्या आखाड्यात गर्दी वाढल्याने लोकांनी पुढे उडी मारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. ६० जखमी भाविकांची माहिती मिळवण्यासाठी १९२० हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे."